Home / नारायणपूरचा महिमा

नारायणपूरचा महिमा

Narayanpurcha Mahima
श्री क्षेत्र नारायणपूरचा महिमा
इंद्रनिल पर्वत म्हणजे आजचा पुरंदर. इंद्राचे दुसरे नाव म्हणजे पुरंदर. ह्याच पर्वतावर इंद्राने तपस्या केली
म्हणून हे स्थान पवित्र झाले. ह्याच इंद्रनिलपर्वताच्या पायथ्याशी श्री क्षेत्र नारायणपूर वसले आहे. येथे प्राचीन पांडवकालीन नारायणेश्वराचे मंदिर आहे म्हणुन या स्थानाला नारायणपूर असे नाव आहे.

भारतामध्ये अनेक संतांनी सत्पुरुषांनी थोर ऋषीमुनींनी वेळोवेळी जन्म घेवून या भारत भूमीस पावन
केले आहे. आणि म्हणुनच प्रत्यक्ष भगवंताला या भूमीत जन्म घेणे आवडले. श्री भगवंतांनी भक्तांच्या कल्याणासाठी तसेच दृष्टांच्या संहारासाठी अवतार घेण्यास हीच भारत भूमी निवडली व पुन्हा याच
भूमीत जन्म घेण्याचे आश्वासन श्री भगवंतांनी स्वतः दिले.
याच भूमीत श्री नारायणपूर या क्षेत्री श्री गुरु दत्तात्र्येयांचे गेल्या कित्येक वर्षापासून जागृत वास्तव्य आहे.

या पुण्यपावन क्षेत्राचा उद्धार व रक्षण करणारे परमपुज्य श्री सद्गुरु नारायण महाराज हे गेल्या बऱ्याच वर्षापासून श्री गुरुदत्तात्रेयांची सेवा व उपासना करीत असून रंजल्या गांजल्यांची दीनदुबळ्या भक्तांची संकटे दूर करीत आहेत. आणि म्हणूनच भाविक भक्तमंडळी हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. दर गुरुवारी, दर पौर्णिमेला येथे फार मोठी यात्रा भरते. दृढभक्ती व भाव असलेल्या भक्तांना त्याचा अलभ्यलाभ मिळतो.

श्री दत्तगुरूंच्या दर्शनाने व परमपूज्य श्री सद्गुरु नारायण महाराजांच्या आशीर्वादाने हजारो व्याधिग्रस्त व व्यसनाधिन व व्यसनमुक्त झाल्या आहेत. त्यांच्या सहवासाने व कृपेने हजारो भक्तांमध्ये समभाव व सत्प्रवृत्ती वाढून माणसामाणसांतील भेद कमी होत आहेत.

जय नारायण | श्री नारायण ||
जय जय जय हो जय नारायण |||
दिगंबरा | दिगंबरा || श्रीपाद वल्लभ दिगंबरा |||

Powered By Indic IME