Home / चारधाम / श्री अनुसया धाम – कन्याकुमारी

श्री अनुसया धाम – कन्याकुमारी

kanyakumari1
श्री अनुसया दत्तधाम
वटटाकोटटाई
मु. पो. अंजीग्राम ता.जि.कन्याकुमारी
प. पू. श्री .श्री .श्री . नारायण महाराजांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले दुसरे धाम म्हणजे अनुसया दत्तधाम
अनुसया दत्तधाम भारत भू च्या दक्षिणेला जिथे तीन समुद्राचा संगम होतो त्या कन्याकुमारी क्षेत्री समुद्र किनारी वटटाकोटटाई या इतिहास प्रसिद्ध किल्ल्याच्या शेजारी अन्जीग्राम येथे उभारले आहे.
या स्थळी महाराष्ट्रातील भगवी टोपी घातलेले व हातात काठी असणारे एक संत २५० वर्षांनी येतील व त्यांच्या हस्ते येथे भव्य मंदिर उभारले जाईल अशी भविष्यवाणी २५० वर्षांपूर्वीच्या एका तामिळ ग्रंथात करण्यात आलेली आहे. हा ग्रंथ कन्याकुमारी येथे उपलब्ध आहे. श्री अनुसया दत्तधामाच्या म्हणजेच कन्याकुमारीच्या दत्तात्रय आश्रमाच्या उभारणीच्या निमित्ताने ती भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्या ग्रंथात उल्लेख असलेल्या महाराष्ट्रातील संत म्हणजे आपले “श्री सद्गुरु अण्णा महाराज”.

श्री क्षेत्र अंजीग्राम येथे अनुसयाद्त्त धामच्या चार दिवसाचा भव्य सोहळा पुढील प्रमाणे पार पडला.
दि. ८/६/२०११ रोजी भव्य मिरवणूक सोहळा करण्यात आला.
दि. ९/६/२०११ रोजी मूर्ती व कलश स्थापना सोहळा करण्यात आला.
दि. १०/६/२०११ रोजी समुद्र जलसिंचन व हवनाचा कार्यक्रम करण्यात आला.
दि. १०/६/२०११ रोजी समुद्र स्नान पर्वणी गंगा मिरवणूक व पूजन करण्यात आले.

Powered By Indic IME